Homeसामाजिकपेरणे-लोणीकंद-फुलगाव जिल्हा परिषद गट व गणातील उभरते कार्यक्षम युवा नेतृत्व.."पै.किरण(शेठ) संपत साकोरे"

पेरणे-लोणीकंद-फुलगाव जिल्हा परिषद गट व गणातील उभरते कार्यक्षम युवा नेतृत्व..”पै.किरण(शेठ) संपत साकोरे”

पेरणे-लोणीकंद-फुलगाव जिल्हा परिषद गट व गणातील उभरते कार्यक्षम युवा नेतृत्व..”पै.किरण(शेठ) संपत साकोरे”

फुलगाव (ता.हवेली) हे पुणे जिल्ह्यात एतिहासिक वारसा लाभलेले भीमा नदीकाठी असलेले लोणीकंद-श्री क्षेत्र आळंदी देवाची रोडवरील महत्वपूर्ण गाव समजले जाते.गावात एम.आय.डी.सी.प्रमाणे अनेक मोठ्या प्रमाणात उद्योग,व्यवसायांच्या कंपन्या उभारल्याने औद्योगिक व दळणवळणाच्या दृष्टीने उद्योग प्रधान व कृषी प्रधान गाव म्हणून हवेली तालुक्यात फुलगावला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

अशा प्रगर फुलगाव गावामध्ये वडील भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष संपत महादू साकोरे व आई फुलगावच्या थेट लोकनियुक्त महिला सरपंच मंदाकिनी संपत साकोरे या आदर्श माता पित्यांच्या पोटी या शेतकरी कुटुंबात २० जुलै १९८७ साली पै.किरण संपत साकोरे यांचा जन्म झाला.

पै.किरण(शेठ) संपत साकोरे यांचे इयत्ता ७ वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण फुलगाव येथील हरी उध्दव धोत्रे विद्यालयात पूर्ण झाले.त्यानंतर आपल्या मुलाला पैलवान बनविण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्यांच्या आई वडिलांनी त्यांना पुढे कुस्ती क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी शिक्रापूर येथे जाणता राजा कुस्ती प्रशिक्षण केंद्र तालमीत टाकले.त्यावेळी पै.संदिपआप्पा भोंडवे यांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाखाली या तालमीत ४ वर्ष कुस्तीचे प्रशिक्षण पै.किरण साकोरे यांनी घेतले.त्यानंतर कोल्हापूर येथे १ वर्ष मोती बाग तालीमीत प्रशिक्षण घेतले,पुणे येथील गोकुळ वस्ताद तालमीत ३ वर्ष प्रशिक्षण घेत कुस्ती क्षेत्रात एकूण ८ ते १० वर्ष प्रशिक्षण घेत सर्वगुण संपन्न बनून महाराष्ट्र राज्य कुमार गटात महाराष्ट्र राज्यात नॅशनल चॅम्पियन होण्याचा मान पैलवान किरण साकोरे यांनी मिळवला.त्यामुळे आजही त्यांना फुलगाव पंचकृषीत पैलवान किरण(शेठ) साकोरे या नावाने संबोधले जाते.

त्यानंतर आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती साधण्याच्या हेतूने पैलवान किरण(शेठ) साकोरे यांनी २०१० साली उद्योग व्यवसायात पदार्पण करीत साईराम स्टोन क्रेशर व्यवसाय सुरू करीत आजवर त्यामध्ये आर्थिक प्रगती केली.हे करीत असताना “आपण समाजाचे काही तरी देणे लागतो” हा हेतू मनाशी बाळगून त्यांनी आपला उद्योग व्यवसाय पाहत समाजसेवा,जनसेवा करण्याच्या दृष्टीने समाजकारण,राजकारणात पाहिलं पाऊल टाकले.पैलवान यांचे वडील संपत साकोरे यांनी फुलगावात भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष पद भोगले होते आपल्या वडिलांचा समाजकारण व राजकारणाचा आदर्श मनात ठेऊन त्यांनी समाजसेवा व जनसेवा करण्याचे काम सुरू केले.

पैलवान यांनी आपली आई मंदाकिनी(नाणी) संपत साकोरे यांना २०१८ साली फुलगाव ग्रामपंचायत थेट महिला लोकनियुक्त सरपंच बनविण्यासाठी मुलगा म्हणून प्रमुख भूमिका साकारली.तर त्यांनी आपल्या आईच्या सरपंच पदाच्या माध्यमातून ५ वर्ष २०१८ ते २०२३ सरपंच पदाच्या कालावधीत गावात अंदाजे ५० कोटींच्या पुढे रक्कमेची अनेक विकासकामे करीत फुलगावात विकासाची गंगा आणून रेकॉर्ड ब्रेक करीत गावचा सर्वांगीण विकास करून दाखविला.फुलगाव येथे सोसायटी निवडणूक असो किंवा अशा अनेक संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी यामागे पैलवान किरण साकोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

-|| अल्प परिचय ||-

जन्म दि.२० जुलै १९८७.

• नॅशनल चॅम्पियन – महाराष्ट्र राज्य कुमार गट कुस्ती स्पर्धा.

• मा.चेअरमन विद्यमान संचालक – फुलगाव विविध कार्यकारी सोसायटी.

• पुणे जिल्हा संचालक – अखिल भारतीय बैलगाडा संघटना.

• संस्थापक/अध्यक्ष – छत्रपती संभाजी राजे माथाडी संघटना.

• संस्थापक – वाघेश्वर तरुण मंडळ,फुलगाव.

• चेअरमन – साईराम स्टोन क्रेशर उद्योग समूह.

• जनसेवक – लोणीकंद-पेरणे-फुलगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती गण.

• वडील संपत महादू साकोरे – उपाध्यक्ष-भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी,फुलगाव(५ वर्ष मागील कालावधी).

• आई सरपंच मंदाकिनी(नाणी) संपत साकोरे – थेट लोकनियुक्त महिला सरपंच,ग्रामपंचायत फुलगाव(५ वर्ष-कालावधी २०१८ ते २०२३).

सद्यस्थितीत स्थितीत गेल्या अनेक वर्षापासून समाजकारण व राजकारणात पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा कंद,शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके,पै.संदिपआप्पा भोंडवे व फुलगाव येथील सर्वच ज्येष्ठ वडीलधारी मंडळी,व आपला सोबत मित्र परिवार या सर्वांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पै.किरण(शेठ) साकोरे उत्तम काम करीत आहेत.समाजकार्य करताना हवेली तालुक्यात युवक,तरुणांना सोबत घेत मोठा मित्र परिवार जोडला आहे.तसेच त्यांचे साकोरे परिवाराचे मोठे नाते सबंध पूर्व हवेलीत आहे.

त्यामुळे या सर्व उत्तम केलेल्या कमंच्या,कार्यांच्या जोरावर सद्य स्थितीत आरक्षण कसेही निघाले तरी आगामी लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गट सदस्य पदाची निवडणूक किंवा लोणीकंद-फुलगाव पंचायत समिती गणात सदस्य पदाची निवडणूक लढण्यासाठी पै.किरण(शेठ) साकोरे यांनी पूर्ण तयारी केली असून नेते प्रदिपदादा कंद व आमदार माऊली आबा कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे पैलवान साकोरे यांनी मुलाखत देताना सांगितले आहे.

त्यामुळे आता लोणीकंद-पेरणे-फुलगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उभरते कार्यक्षम युवा नेतृत्व म्हणून..”पै.किरण(शेठ) संपत साकोरे” यांच्याकडे पाहिले जात आहे.त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत अशा शुभेच्छा पै.किरण(शेठ) साकोरे यांना त्यांच्या आज २० जुलै २०२५ रोजी वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिकांनी त्यांना दिल्या आहेत.

• [आजवर स्व:खर्चातून केलेली विकासकामे,राबविलेल्या बैलगाडा घाट स्पर्धा,दिलेल्या आर्थिक देणग्यांमुळे;दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पै.किरण(शेठ) साकोरे यांची नवी ओळख:-

पै.किरण(शेठ) साकोरे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त २०११,२०१२,२०१३ सलग तीन वर्ष मोठ्या बक्षिसांची मोठी बैलगाडा घाट शर्यत स्पर्धा आयोजित केल्या.तर २०१९,२०२० सालीही त्यांनी पुन्हा बैलगाडा शर्यत स्पर्धा भरवल्याने बैलगाडा घाट क्षेत्रात त्यांच्या नावाचा डंका पुणे जिल्ह्यासह राज्यात होऊ लागला.त्यानंतर मागे फुलगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत स्व:खर्चातून १६ लाख रुपये किंमतीची थार गाडी बक्षीस म्हणून पैलवान साकोरे यांनी दिली,फुलगाव-वढू खुर्द येथे हिंद केसरी बैलगाडा घाट बांधण्यासाठी प्रमुख भूमिका बजावत यासाठी स्वतः१४ लाख रुपये खर्च केला,पंढरपूर फुलगाव धर्मशाळा बांधण्यासाठी ४ लाख रुपये स्वतःखर्च दिला,लोणीकंद,पेरणे,तुळापूर,आदी गावात बैलगाडा घाट बांधण्यासाठी प्रत्येकी १ लाख देणगी दिली,लोणीकंद,पेरणे,सह परिसरातील गावांतील दिंडीला प्रत्येकी ११ ते २१ हजार रुपयांची देणगी दिली,पेरणे दिंडी १ लाख मदत,पंढरपूर येथे भावडी गावच्या धर्मशाळेसाठी ५१ हजार देणगी दिली,गेल्या ८ वर्षापासून प्रत्येक वर्षी फुलगाव,तुळापूर दिंडीसाठी २१ हजार देणगी मदत,फुलगावातील शनी मंदिरात स्व:खर्चातून सीसीटिव्ही कॅमेरे बसविले,इनव्हीटर दिला,फुलगाव यात्रेत दरवर्षी सर्वात मोठे बक्षीस देण्याचे काम,पंचक्रोशी परिसरातील प्रत्येक गावात यात्रेत देणगी रुपी मदतीचा हात,या वाढदिवसानिमित्त त्यांनी इतरत्र खर्चाला फाटा देत फुलगाव सोसायटीची ईमारत,तलाठी कार्यालय,पोस्ट कार्यालय,अशी एकत्रित ईमारत बांधण्यासाठी एकूण अंदाजे ५ लाख रुपये खर्च करून सर्व स्टील दिले आहे,तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांना देणग्यारूपी मदत,प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात मदत, मंडळांना देणग्यारुपी दरवर्षी मदत,अशी अनेक न मोजता येणारी मदत देण्याचे आदर्शवत का असून आजवरही ते करीत असल्याने समाजात “एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पैलवान किरण(शेठ) साकोरे यांचे नाव प्रचलित झाले आहे”.]

-|| लेख शब्दांकन व संकलन:-पत्रकार विजयराव लोखंडे,हवेली तालुका,पुणे,मो.७७७३९२९०४८ ||-

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावकारकी प्रकरणात बंदुकीचा धाक; जमीन बळकावल्याचा आरोप, त्रासाला वैतागून व्यावसायिकाचे विष प्राशन; चौघांविरोधात गुन्हा...

सावकारकी प्रकरणात बंदुकीचा धाक; जमीन बळकावल्याचा आरोप, त्रासाला वैतागून व्यावसायिकाचे विष प्राशन; चौघांविरोधात गुन्हा दाखल ✍️नितीन करडे उरुळी कांचन पोलीस स्टेशन परिसरात बेकायदेशीर सावकारी व अवाजवी...

वाघोलीत आईकडून मुलाची गळा कापून हत्या; मुलगी गंभीर जखमी, आरोपी आई अटकेत

वाघोलीत आईकडून मुलाची गळा कापून हत्या; मुलगी गंभीर जखमी, आरोपी आई अटकेत ✍️ नितीन करडे  पुणे : वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाइफ रोड, वाघोली येथील पठाण हाईट्स...

प्रयागधाम फाटा येथे स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी, स्कॉर्पिओ...

प्रयागधाम फाटा येथे स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी, स्कॉर्पिओ चा चक्काचूर ✍️ नितीन करडे हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील...

उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते यांना अधिकृत...

उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते यांना अधिकृत उमेदवारी जाहीर पुणे | प्रतिनिधी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन–सोरतापवाडी गटात...

पाच दिवसात करणी-जादूटोण्याची संशयस्पद दुसरी घटना; उरुळी कांचनमध्ये भीती, संताप आणि संशयाचे वातावरण

पाच दिवसात करणी-जादूटोण्याची संशयस्पद दुसरी घटना; उरुळी कांचनमध्ये भीती, संताप आणि संशयाचे वातावरण ✍️ प्रतिनिधी | नितीन करडे  उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात पुन्हा एकदा करणी-भानामती...

error: Content is protected !!