Homeमहत्त्वाचेपुणे–सोलापूर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या पाच-पाच रांगा; रुग्णवाहिकाही अडकल्या, नागरिक त्रस्त

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या पाच-पाच रांगा; रुग्णवाहिकाही अडकल्या, नागरिक त्रस्त

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या पाच-पाच रांगा; रुग्णवाहिकाही अडकल्या, नागरिक त्रस्त

✍️नितीन करडे

पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावर शुक्रवारी ता. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी भीषण वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली असून रवी दर्शन ते फुरसुंगी चौक या परिसरात सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांची तर फुरसुंगी फाटा ते कदमवाक वस्ती या भागात पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक वाहनचालकांना दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ रस्त्यावर अडकून पडावे लागले.

रुग्णवाहिकाही अडकल्या, उलट दिशेने वाहने धावू लागली

वाहतूक कोंडी इतकी तीव्र झाली की काही वाहनचालकांनी अक्षरशः विरुद्ध दिशेने वाहने वळवून पुढचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात अनेक रुग्णवाहिका देखील कोंडीत अडकून राहिल्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

या कोंडीबाबत वाहनचालकांनी मोठा संताप व्यक्त केला

“शेवळवाडी मार्केटपासून फुरसुंगी फाट्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला दोन ते अडीच तास लागले. खूप वेळापासून वाहतूक ठप्प होती. अनेक वाहनांनी उलट्या दिशेने जाऊन वाहतूक आणखीन विस्कळीत केली.”
           : सिंगूदेव खताळ, एक वाहन चालक

“अडीच तास होत आले, पण आम्ही अजूनही कोंडीत अडकून आहोत. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी तर पाच-पाच रांगा लावल्या. बेशिस्त वाहन चालक आणि योग्य नियंत्रणाचा अभाव यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. पोलीस नेमके कुठे आहेत?”

                  : दीपक टीकोळे-  वाहनचालक 

पोलीस यंत्रणा कुठे नागरिकांचा सवाल ?

स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या मते,  काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीस दिसले नाहीत,   ज्यामुळे वाहन चालवणाऱ्यांनी मनमानी मार्ग अवलंबला,  यामुळे कोंडी आणखी वाढली, कोंडीचे कारण अद्याप स्पष्ट नाही.

घटनास्थळी पोलीस किंवा संबंधित वाहतूक विभागाकडून अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी, वाढलेली भारी वाहनांची ये-जा, किंवा एखादा अपघात, ही संभाव्य कारणे असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहेत.

        नागरिकांना मोठा त्रास

दररोज या मार्गाने प्रवास करणारे हजारो नागरिक, कामगार, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यापारी यांना प्रवासात दुप्पट-तिप्पट वेळ लागत आहे. अनेकांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू ✍️नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३...

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सोरतापवाडी फाटा येथे गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार...

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत?

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत? ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : जेजुरी–बेल्हे महामार्गावरील शिंदवणे घाट (ता. हवेली) येथे बुधवारी (ता....

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि...

error: Content is protected !!