पुणे बुलेटिन न्यूज इफेक्ट!
उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोर पडलेला स्ट्रीट लाईटचा खांब ग्रामपंचायतीने तात्काळ हटवला
✍️ नितीन करडे
पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोर आज पहाटे झालेल्या ट्रक अपघातात स्ट्रीट लाईटचा खांब रस्त्यावर कोसळून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. हा धोकादायक खांब रस्त्यावर पडल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता होती.
घटनेची माहिती मिळताच पुणे बुलेटिन न्यूजने तत्काळ प्रसारित केली.
बातमी प्रसारित होताच उरुळी कांचन ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. ग्रामपंचायत कर्मचार्यांनी पडलेला खांब उचलून रस्ता पूर्णपणे मोकळा केला.
स्थानिक नागरिकांनी पुणे बुलेटिन न्यूजचे आभार मानले आणि माध्यमाच्या बातमीमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे सांगितले.























