कोरेगाव मूळ परिसरातील चोऱ्यांचे सत्र थांबेना ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
✍️नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत अनेक दिवसापासून सतत चोऱ्या होत असल्याचं समोर येत असून होणाऱ्या चोऱ्या काही थांबेना!
कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रा. हद्दीतील इनामदार वस्ती येथील परिसरात रात्री काही ठिकाणी घरफोड्या झाल्या असल्याच्या घटना शुक्रवार (ता. १३ फेब्रुवारी) रोजी सकाळी उघडकीस आल्या. या घरफोडी मध्ये बंद असलेल्या घरे फोडली असल्याचे माहिती समोर आली आहे. यावेळी स्वप्निल कानकाटे यांनी सांगितले की आमचे बंद घर फोडून काही मौल्यवान वस्तू चोरून नेल्या व कपाटातील सामान अस्तवेस्त फेकून दिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार ता १३ फेब्रुवारी रोजी मध्य रात्री इनामदार वस्ती परिसरात एका कॅमेरात हत्यार बंद चोरांची आठ जणांची टोळी दिसत असुन त्यामधे चोरांनी मोठी काहीतरी जड वस्तू चोरी करून घेऊन जाताना दिसत आहे. तर एका चोराच्या हातात कोयता दिसत आहे.
कोरेगाव मूळ परिसरात एवढे हत्यार बंद चोर कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या हत्यार बंद चोरांनी इनामदार वस्ती परिसरात घरफोड्या करून काही मौल्यवान ऐैवज चोरून नेला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावेळी पहाटे परिसरातील नागरिकांना चोरांची चाहूल लागल्याने चोरांनी त्या ठिकाणाहून पळून जात असताना भिंतीवरून उडी मारताना चोरांची एक बॅग पडली त्या बॅगेत कोकरी, चाक, पकड, पाहने, कात्री , बॅटरी, हातमोजे, कटर, तोडांचे मास्क, स्क्रू ड्रायव्हर, बुट, चप्पल अशा वस्तू बॅगमध्ये आढळून आल्या. तसेच तीन दिवसांपूर्वी कोरेगाव मूळ ग्रा. पंचायत हद्दीत श्रीनिवास सोसायटीतील रात्रीच्या वेळेस एक रिक्षा चोरून नेली तसेच परिसरात काही दिवसापासून किरकोळ चोऱ्यांचे सत्र चालूच असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची केबल, शेड फोडून शेती अवजारे, शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी दोन शेळ्या, दोन मेंढ्या, बंगल्याचे बांधकाम चालू असलेल्या घराचे वायरिंग, तसेच क्रेन च्या बॅटऱ्या, अशा अनेक चोऱ्या कोरेगाव मूळ परिसरात काही दिवसापूर्वी झाले असल्याची माहिती मिळत आहे. तरीही गेले काही दिवसापासून कोरेगाव मूळ परिसरातील चोऱ्यांचे सञ काही थांबेना.
[कोरेगाव मुळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने परिसरात चोऱ्यांचे प्रमाण जास्त वाढले आहेत.]
– सुदर्शन कानकाटे- ग्रामस्थ कोरेगाव मूळ
[चोरी व खुणाचा प्रकार झाल्याने आम्ही ग्रामपंचायतीला परीसरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी अनेक वेळा मागणी केली आहे पण अद्याप कॅमेरे बसले नाहीत.]
– पोलीस पाटील, कोरेगाव मूळ
[दोन महिन्यापूर्वीच ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत ठराव करून कॅमेरे बसवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. पण अद्याप चौका चौकात कॅमेरे बसले नाहीत.]
– विठ्ठल शितोळे – ग्रा. सदस्य कोरेगाव मूळ

























