ओएमएसएस पुणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मध्ये फ्रेशर पार्टी उत्साहात साजरी
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील शितोळे वस्ती येथे असलेल्या OMSS PUNE College of Physiotherapy मध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर पार्टी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. क्रांती संगम फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य विरेंद्र मिश्राम यांनी प्रस्तावना देताना नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. फ्रेशर पार्टीमुळे नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होते आणि आत्मविश्वास वाढतो,असे त्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी आपल्या मनोगतात आकाशातील तेजस्वी ‘नोवा’ ताऱ्याचे उदाहरण देत महाविद्यालयाशी संलग्न असलेले प्रयागधाम हॉस्पिटल (prayagdham Hospital) हे त्या ताऱ्यासारखे उज्ज्वल आणि प्रेरणादायी केंद्र असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून शंभर टक्के निकाल मिळवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संस्थेचे सचिव संगमेश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्य, शिस्त आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व पटवून दिले. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी नृत्य व गायन सादर करून रंगत आणली. सूत्रसंचालनाची जबाबदारी विद्यार्थी अनुष्का बनसोड आणि उदय परमा यांनी समर्थपणे पार पाडली. फ्रेशर पार्टीमुळे नवीन विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता, एकोपा आणि महाविद्यालयीन जीवनाची सकारात्मक सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी डॉ. प्राची शेडगे, दात्री भट्टाचार्य, रघुनाथ पाटील, प्रियांका पाटील, डॉ. श्यामलीला बावगे (जेवळे), हवेली तालुका गटविकास शिक्षण विस्तार अधिकारी राठोड शेषराव तसेच सनराईज शाळेचे चेअरमन गणेश शितोळे उपस्थित होते.
योग्य फिजिओथेरपिस्ट बनण्यासाठी अभ्यासात सातत्य राखणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर चिकाटी, स्वतःवरील विश्वास आणि पेशंट प्रॅक्टिस व केस स्टडीचा सखोल अभ्यास हे यशस्वी करिअरसाठी महत्त्वाचे घटक
– महात्मा आत्माप्रेमानंद- सचिव, प्रयागधाम हॉस्पिटल























