पुणे प्रतिनिधी -नितीन करडे
महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक बापू पवार यांना उरुळी कांचन पंचकृशीतील नागरिकांनी पाठिंब्याला उस्फूर्त प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम उरुळी कांचन व पंचकृशीतील कार्यकर्त्यांच्या वतीने उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदीर येथे घेण्यात आला. यावेळी उरुळी कांचन येथील माजी सरपंच, माजी उपसरपंच, तसेच महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थितीत होते. चर्चा सभा झाल्यानंतर रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा घोषणा देत गावात रॅली काढण्यात आली. तसेच या क्रार्यक्रमाचे सुञसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उरुळी कांचनचे शहर अध्यक्ष रामभाऊ तुपे यांनी केले.
काळुराम मेमाणे- शिवसेना जिल्हा उपप्रमुख (उ बा ठा)
एकजुटीने एक ताकतीने पुन्हा एकदा अशोक बापु पवार यांनी निवडून आणायचं आहे.उ बा ठा गट खंबीर पाठिशी उभा राहअणार आहे.
राजेंद्र टिळेकर – विश्वस्त महात्मा गांधी सर्वदय संघ
शरद पवार यांचे देशात व राज्यात तसेच उरुळी कांचन साठी मोठे योगदान असुन उरुळी कांचन येथील महात्मा गांधी व विविध शाळेंसाठी ४३ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच सरसकट लाईट बिल, शेती कर्ज माफ केले. महिलांना अरक्षण बाबत मोठे योगदान आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून आणायचे आहे.
सोपान कांचन – सचिव,महात्मा गांधी सर्वोदय संघ
शेतकराला बाजार भाव मिळत नाही, तो जर पाहिजे असेल तर आपल्याला शरद पवार सांहेबांचे निष्ठावंत उमेदवार अशोक पवार यांना निवडून आणायचं आहे. मतदान पाहिजे तेव्हढे होत नाही तर ते ६० टक्केच्यापुढे झाले पाहिजे त्याचा आपल्या उमेदाराला मोठा फायदा होईल.
देवीदास भन्साळी- अध्यक्ष, काँग्रेस प्रदेश
शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षातुन अनेक नेते घडले आहेत. आणि प्रामाणिक कार्यकर्ते अजुन ही निष्ठावंत आहेत. निष्ठा असेल तर नक्कीच आमदार होतो. मला फक्त्त जनेतेचे काम करायचं आहे. अशोक पवार यांना अमोल कोल्हे पेक्षा जास्त मतदान होईल. उरुळी कांचन चे अस्तित्व ठिकवायच असेल तर कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवुन एक जुटीने कामाला लागुन अशोक पवारांना बहुमताने विजयी करा.
के डी कांचन – मा. चेरमन यशवंत स सा कारखाना
उरुळी कांचन मधुन अशोक पवार यांना ८०% मतदान होण्याचा पर्यंत करुन अशोक पवर यांना बहुमताने विजयी करा. पंचकृशीतुन कार्यकर्त्यांनी जागरूक होऊन काम केले तर नक्कीच तेव्हढे मतदान होईल.























