उरुळी कांचन येथील नवमोरी खालील रस्ता सोमवारपासून १३ दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद
उरुळी कांचन : पुणे-दौंड लोहमार्गावरील उरुळी (ता. हवेली) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपुलाखालील नवमोरीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारपासून (ता.२२ सप्टेंबर, ते ५ ऑक्टोबर) १३ दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन रेल्वेच्या पुणे विभागाने केले आहे.
तीन तालुक्यातील २०-२५ गावे व ४० वाड्या वस्त्या उरुळी कांचन बाजारपेठेवर अवलंबवून आहेत. उरुळी कांचन येथील रेल्वेच्या नवमोरीच्या बोगद्यातून दत्तवाडी, भवरापुर, टिळेकरवाडी, खामगाव टेक, प्रयागधाम, शिंदेवाडी, मेमाणवाडी, सिरसवडी, भिवरी, गोते मळा, नायगाव, पेठ, अष्टापूर व हिंगणगाव या गावांना रस्ता जातो. हा रस्ता मोठ्या वर्दळीचा असून अनेक गावांना जोडला आहे. तरी या गावातील सर्वांनी नोंद घ्यावी. व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रेल्वेच्या नवमोरीच्या उड्डाणपुलाचे व पुलाच्याखालचे डागडुजीचे, दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ दिवसांचा कालावधी लागणार असून, आज (सोमवार, ता.२२ पासूनत. ५ ऑक्टोबरपर्यंत) बंद राहणार आहे. ता. ६ ऑक्टोंबरपासून हा रस्ता पुन्हा नागरिकांसाठी पूर्ववत करण्यात येणार आहे. यादरम्यान नागरिकांच्या असुविधेबाबत रेल्वे प्रशासनाने नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली आहे. या गावातील सर्वांनी नोंद घ्यावी. व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, नऊमोरी रस्ता १३ दिवसांसाठी बंद राहणार असल्याने नवमोरीच्या पलीकडल्या व अलीकडल्या नागरिकांना ये जा करण्यासाठी २-३ किमी अंतराचा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. नागरिकांना उरुळी कांचन अथवा पुणे सोलापूर रस्त्याकडे जाण्यासाठी कोरेगाव मूळ येथील रेल्वेगेटचा वापर करावा लागणार आहे. तसेच टिळेकर वाडी, खामगावच्या नागरिकांनी जोगेश्वरी हाटेल च्या बाजुच्या रेल्वे मोरीचा वापर करावा लागणार आहे.
या पर्यायी मार्गाचा वापर करावा –
उरुळी कांचन मनीभाई पतसंस्था शेजारील रेल्वे मोरी, लोणकर वस्ती येथील मोरी, पेठ येथील मोरी, अल्ट्राटेक कंपनी शेजारील भुयारी मार्ग, कोरेगाव मूळ रेल्वे फाटक
“जेजुरी आळेफाटा राज्यमार्गाचा बायपास असल्याने आताच कोरेगाव मुळ रेल्वे गेट जाम असते. उरुळी कांचन नवमोरी बंद केल्यानंतर रेल्वे गेटवर वाहतुकीचा ताण वाढणार असून वाहतूक कोंडी नाकारता येत नाही, तरी प्रशासनाने याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.”
: वर्षा कड, कोरेगावमुळ पोलीस पाटील.
” नऊमोरी येथील तीन भुयारी मार्ग वाहतुकीसाठी आत्तापर्यंत चालू होते. पुलाचे व डागडुजीचे उद्यापासून काम चालू होणार असून त्यातील आपण एक भुयारी मार्ग चालू ठेवणार आहोत. तरी परिसरातील नागरिकांनी याची दक्षता घ्यावी व पर्यामार्गाचा वापर करावा.”
: ऋतुजा अजिंक्य कांचन – सरपंच, उरुळी कांचन























