Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्याप्रकरणी आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीस” असा आरोपीचा खुलासा

उरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्याप्रकरणी आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीस” असा आरोपीचा खुलासा

उरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्याप्रकरणी आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीस” असा आरोपीचा खुलासा

✍️नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) – तुपे वस्ती परिसरात किरकोळ कारणावरून दुकानदारावर करण्यात आलेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी आरोपीची धिंड काढत पोलिसांनी निषेधात्मक कारवाई केली. शनिवार, ता. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान उरुळी कांचन पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात आरोपी स्वप्निल बाळु ओव्होळ (रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन) याची सार्वजनिक धिंड काढण्यात आली.

(ता. 25 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी तुपे वस्ती येथील देवी मंदिरासमोर किरकोळ वादातून दुकानदार प्रभाकर तुपे (वय 60) यांच्यावर आरोपी स्वप्निल ओव्होळ यांनी धारदार चाकूने सलग तीन ते चार वार पोटात, व हातावर वार केले होते. या हल्ल्यात तुपे गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर पोलीस तपासाला लागले आणि आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपासाअंती आज आरोपीची धिंड काढत घटनास्थळाची पाहणी तसेच जाब विचारणा करण्यात आली.

मोठ्या पोलीस बंदोबस्तात आरोपीला सुरुवातीला तुपे वस्ती येथील हल्ला झालेल्या ठिकाणी नेण्यात आले. येथे पोलिसांनी त्याची सविस्तर चौकशी केली. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. जाब विचारताना पोलिसांनी आरोपीला प्रश्न केला, “इथला दादा कोण?” यावर आरोपीने ठामपणे उत्तर दिले,“इथला दादा पोलीस!”

त्यानंतर तुपे वस्ती – रेल्वे स्टेशन – एम.जी. रोड मार्गे उरुळी कांचन पोलीस स्टेशनपर्यंत आरोपीची धिंड काढण्यात आली. या धिंडीचे उद्दिष्ट गुन्हेगारीविरोधात जनजागृती आणि नागरिकांमध्ये कायद्याबद्दल विश्वास निर्माण करणे असे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सपोनि ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, अनिल खोमणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पोलीस हवालदार निलेश जाधव, प्रविण चौधर, प्रशांत पवार, संतोष जाधव, प्रदीप बालगुडे, अशिष उल्हाळकर, ऋषिकेश सासकर, राजकुमार भिसे, सुदर्शन माने, अश्वजीत मोहड, महिला पोलीस हवालदार सुजाता भुजबळ, महिला पोलीस शिपाई सुवर्णा गायकवाड आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाकू हल्ल्याच्या गुन्ह्याचा तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपीचा पूर्वेतिहास, तसेच इतरांचा सहभाग तपासला जात आहे. प्रभाकर तुपे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे माहिती समोर आली आहे.

“आरोपीची धिंड काढल्याने नागरिकाकडून पोलिसांचे कौतुक ”

मला शहराची कीड ग्रामिण भागात उरुळी कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावाला लागून द्यायची नाही, कसलेही चुकीचे काम खपवून घेणार नाही. गुन्हेगार वृत्तीच्या लोकांना माझा इशारा आहे. माझ्या हद्दीत चुकीचे काम खपून घेणार नाहीत.

                     : सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक                        -उरुळी कांचन पोलीस स्टेशन
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू ✍️नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३...

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सोरतापवाडी फाटा येथे गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार...

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत?

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत? ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : जेजुरी–बेल्हे महामार्गावरील शिंदवणे घाट (ता. हवेली) येथे बुधवारी (ता....

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि...

error: Content is protected !!