Homeक्राईमहवेली तालुक्यातील सराईत हातभट्टीवाला एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध

हवेली तालुक्यातील सराईत हातभट्टीवाला एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध

✍️नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील अवैध हातभट्टी व्यवसायावर मोठी कारवाई करत ऊरुळीकांचन पोलिसांनी सराईत हातभट्टीवाला क्रिश जॉनी राठोड (वय २०, रा. शिंदवणे) याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे. नगरपालिकांसह आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

सदर इसमाविरुद्ध यापूर्वी हातभट्टीची दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीसह एकूण पाच गुन्हे दाखल होते. सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी प्रस्ताव सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश दिले.

दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांनी क्रिश राठोड याला ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे दाखल केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांना मोठा आळा बसला असून नागरिकांनी पोलिसांच्या या ठोस कारवाईचे स्वागत केले आहे.

ही कामगिरी संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण, बापुराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौड उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा, निरीक्षक सचिन वांगडे, उरुळी कांचन पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, सहा.पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, पो. हवा योगेश नागरगोजे, स्थानिक गुन्हे शाखा, अजित काळे, सचिन जगताप, शैलेश लोखंडे, प्रवीण चौधर, निलेश जाधव, प्रशांत पवार, उध्दव गायकवाड, कमलेश होले, सलीम शेख, पो.कॉ सागर बोत्रे, शरद चव्हाण, राजकुमार भिसे, बंडु बालगुडे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

error: Content is protected !!