Homeक्राईमवयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत
✍️ नितीन करडे

पुणे प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील नेतवड येथील कुटेमळा येथे ९५ वर्षीय वृद्धाच्या घरात झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात ओतूर पोलिसांना यश आले असून, चोरीतील ४ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेतवड कुटेमळा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील बजाबा महादू कुटे (वय ९५) यांनी त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिने घरातील पोटमाळ्यावर सुरक्षित ठेवले होते. ता. १ मे, ते ७ मे दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून पेटीचा कडी-कोयंडा तोडत त्यातील सुमारे ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीतील मुद्देमालामध्ये तीन तोळ्यांचे मनीमंगळसूत्र, अडीच तोळ्यांची सहा सोन्याची पाने व एक पुतळा, अर्धा तोळ्याची नथ तसेच एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या पेट्या असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा ऐवज होता.

याप्रकरणी तान्हाजी बजाबा कुटे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती व स्थानिक चौकशीच्या आधारे अभिषेक खंडू कुटे (वय ३२, सध्या रा. टिटवाळा, ठाणे; मूळ रा. नेतवड कुटेमळा) याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्याला १३ मे रोजी अटक केली.व आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या कामगिरीमुळे ओतूर पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. चोरीस गेलेले दागिने परत मिळाल्याने फिर्यादी कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी मौल्यवान दागिने व रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी तसेच ग्रामपंचायतीमार्फत अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे आवाहन ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी केले.

तर ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर यात सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पो हवा नरेंद्र गोराणे, बाळशिराम भवारी तसेच पोलीस कर्मचारी विशाल गोडसे, आशिष जगताप आणि योगेश उकिर्डे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना ✍️ नितीन करडे पुणे : प्रस्तावित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गासंदर्भात मेट्रो प्रशासनाच्या...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ...

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे...

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा येथे गुरुवार...

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल उरुळी कांचन प्रतिनिधी : नायगाव फाटा (ता. हवेली) परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून...

error: Content is protected !!