पुणे प्रतिनिधी : शरदचंद्र पवार साहेबांच्या संघर्षात खांद्याला खांदा लावून लढणारा योद्धा कार्यकर्ता म्हणून अशोक बापू पवार यांची ओळख आहे. त्यांच्या कुटुंबाला संकटात आणण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक संकटाला अशोक बापू पवार खंबीर उभे आहे. त्यांचे कोणी काहीच बिघडु शकत नाही. हे विधानसभेचे इलेक्शन चालले का? काय भलतंच चाललंय ? त्याच कारण निष्ठा, सेवा हे फक्त आपल्या बाजूचे शब्द झाले आहेत. तर समोरच्या बाजूचे महाराष्ट्राला न शोभणारी अशी भाषा सातत्याने वापरली जाते. ‘बटेंगे तो कटेंगे ‘ अरे बाबा अशी भाषा कशी वापरू शकते मी. माझ्यासमोर वयाने मोठे अशोक बापू पवार आणि समोर जनता आहे. ती अशा भाषा वापरतात त्यांच्याकडे आपल्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही म्हणून अशी गलिच्छ भाषा ते वापरायला लागलेत खरंच आज राज्यासमोर मध्ये काय ? आहेत. आज राज्यात प्रचंड महागाई ला तोंड द्यावा लागत आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष जबाबदार आहेत. आजची प्रचंड महागाई केली. तो त्यांचा मोठा गुन्हा आहे. महागाई बेरोजगारी कोणामुळे वाढली तर ती फक्त भारतीय जनता पक्षामुळे वाढली असुन सातबारा वाचवा, तुतारी वाजवा असे यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
