Homeक्राईमपुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखेची कारवाई!

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखेची कारवाई
✍️ नितीन करडे

पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला तांत्रिक माहितीच्या आधारे शिताफीने ताब्यात घेत अटक केली. दिपक आबाजी तुपे (वय ३९, रा. लेन नं. १, राजस सोसायटी, गणपती मंदिराजवळ, विद्यानगर, कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे ३६४/२०२६, एन.डी.पी.एस. कायद्या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दिपक तुपे हा पाहिजे आरोपी होता. अंमली पदार्थ विरोधी पथक-२ च्या पथकाला आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात आला.

आरोपी पुणे-सोलापूर महामार्गावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर वानवडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दिपक तुपे याच्याविरुद्ध यापूर्वी आंध्र प्रदेश राज्यात व्यापारी प्रमाणातील एनडीपीएस कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल झाले असून, त्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. तसेच तो ओडिसा राज्यात गांजा आणण्यासाठी गेला होता.
दरम्यान, त्याचे साथीदार १७ ऑगस्ट २०२६ रोजी व्यापारी प्रमाणातील गांजासह पकडले गेल्याने आरोपी महाराष्ट्रात परत आला होता. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

आंतरराज्य गांजा तस्करीच्या टोळीवर पोलिसांचा शिकंजा
या कारवाईमुळे पुणे शहरात परराज्यातून गांजा आणून त्याची विक्री करणाऱ्या संघटित टोळीविरोधात पोलिसांनी कारवाईला वेग दिला आहे. या टोळीची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी पोलिसांकडून ठोस आणि प्रभावी तपास सुरू आहे.

दिपक तुपे हा चंदननगर तसेच वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील एनडीपीएस गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याला संबंधित दोन्ही गुन्ह्यांमध्ये वर्ग करून पुढील अटकेची कार्यवाही करण्यात येणार आहे.

आरोपीला वानवडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत गांजा तस्करीच्या नेटवर्कसह इतर साथीदार आणि परराज्यातील संपर्कांचा तपास होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, गुन्हे गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-३ शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण तसेच पोलीस हवालदार योगेश कुंभार, सतीश चव्हाण, पृथ्वीराज पांडुळे, शरद धांडे, सुमित यादव, प्रशांत कळसकर, संदिप देवकाते, विनोद निंभोरे, अमोल जगताप, सुरेखा साबळे, सुकेशिनी आंबले, आरती दिवेकर, तसेच पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, अमोल गायकवाड, अमोल मुंढे आणि देवीदास वांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

error: Content is protected !!