Homeक्राईमपुणे शहरात मॅफेड्रोन विक्रेत्यांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा; ७ लाख ५...

पुणे शहरात मॅफेड्रोन विक्रेत्यांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा; ७ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

पुणे शहरात मॅफेड्रोन विक्रेत्यांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा; ७ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त!
गुलटेकडी मार्केटयार्ड परिसरात तिघांना घेतले ताब्यात; २४.६३ ग्रॅम एम.डी. मॅफेड्रोनसह मोबाईल, ऑटो रिक्षा आणि रोकड जप्त

✍️ नितीन करडे

पुणे : पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ ने मोठी कारवाई केली आहे. गुलटेकडी मार्केटयार्ड परिसरात मॅफेड्रोन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या संशयितांवर छापा टाकून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ७ लाख ५ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार १४ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आली.

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व पथकातील कर्मचारी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या अनुषंगाने गस्त घालत होते. यावेळी गुलटेकडी येथील वारणा सहकारी बँकेच्या इमारतीलगत, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर, उत्सव समिती चौक ते गंगाधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका काळ्या-पिवळ्या रंगाच्या बजाज ऑटो रिक्षामध्ये तिघे संशयास्पदरीत्या बसलेले आढळून आले.

पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २४.६३ ग्रॅम वजनाचे ४ लाख ९२ हजार ६०० रुपये किमतीचे मॅफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थ आढळून आले. याशिवाय ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, १ लाख ५० हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा आणि २ हजार ८२९ रुपये रोख रक्कम असा एकूण ७ लाख ५ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी सुभाषगौडा गुरन्ना चौधरी (वय ३२), बाप्पू भिमा बाळशंकर (वय २८) आणि शाहरुख मेहबूब खान (वय २८, सर्व रा. आंबेडकर नगर, मार्केटयार्ड, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण तसेच पोलीस अंमलदार अमोल जगताप, सतीश चव्हाण, शरद धांडे, संदीप देवकाते, योगेश मांढरे, योगेश कुंभार, महिला पोलीस अंमलदार सुरेखा साबळे, जानवी सूर्यवंशी, सुकेशिनी आंबले आणि पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी सहभाग घेतला.

पुणे शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; तब्बल आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा; रुग्णवाहिका ही...

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; तब्बल आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा; रुग्णवाहिका ही अडकून!  महामार्गावरून विरुद्ध दिशेने वाहनांची सुसाट धाव; वाहतूक नियोजनाचा बोजवारा, अपघाताची...

उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन जण गंभीर जखमी

उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन गंभीर जखमी एचपी पेट्रोल पंप चौकातील अपघात; कस्तुरी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून जखमींना तातडीने मदत   उरुळी कांचन (ता. हवेली) :...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता जेरबंद, ८.८६० किलो गांजा जप्त! कोंढवा, वानवडी परिसरात छापे; गांजाची किंमत...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच बुलेटच्या फटाका बारचा नागरिकांना नाहक त्रास 25 ते 30 जणांची टोळी बारा ते...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी पकडले! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ...

error: Content is protected !!