नितीन करडे
पुणे: थेऊर येथे दोन महिन्याच्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून आईने आत्महत्येचा प्रयत्न केला असुन दोन जुळ्या बालकांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना मंगळवार दि. 8 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.
प्रतिभा हेमंत मोहीते वय 35 वर्ष रा. आष्टा मिरजगांव ता. वाळवा जि. सांगली ही महिला बाळतपणासाठी (जुन 2024 रोजी) माहेरी थेऊर येथील दत्तनगर येथे आली होती. मंगळवार दि. 8 एप्रिल रोजी पहाटे घरतील सर्व झोपेत असतानाच घराच्या टेरीसवर जाऊन पाण्याची 1000 लिटरच्या टाकीत दोन्ही बाळांना टाकुन ती स्वतः पाण्यात बुडत होती. त्या टेरीस समोरील बिल्डिंग मधील एका तरुणाने तीच्या भावाला फोन करुन सांगितले कि तुमच्या पाण्याच्या टाकीत कोणतरी बुडत आहे. भाव टेरीस वर गेला त्यावेळी आई पाण्याच्या टाकीत बुडत होती. त्याने बहीनीला टाकीतुन बाहेर काढले पण दोन्ही बाळांचा माञ जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के पो अमं मंगेश नानापुरे, विशाल बनकर, जगताप, महिला पो हवा भारती होले, अश्विनी पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. व पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे करीत आहेत.























