तरुणीच्या खुनातील आरोपीची उरुळी कांचन पोलिसांनी काढली धिंड!
✍️ नितीन करडे
हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीस वर्षीय तरुणीच्या निर्घृण खुनाने हादरलेल्या उरुळी कांचन परिसरात आज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आरोपीची बाजारपेठेतून धिंड काढत दाखवली खरी “पोलीसगिरी”. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
“उरुळी कांचन पोलिसांच्या या धडाकेबाज पावलामुळे परिसरात दहशत आणि नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत पायी चाललेल्या तरुणीला आरोपीने शरीर सुखाची मागणी केली होती त्याचा विरोध तरुणीने केल्याने २० वर्षीय तरुणीचा खून झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तरुणीचा खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात उरुळी कांचन पोलिसांनी तत्परतेने तपास करून संशयित आरोपीला अटक केली. आज आरोपीला बाजारपेठेतून पोलिसांनी धिंड काढून जनतेसमोर उभं केलं, ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारांना स्पष्ट इशारा मिळाला आहे की “अशा गुन्हेगारीला पोलिसांकडून अजिबात पाठीशी मिळणार नाही.”
धिंड काढताना पोलिसांचा जंगी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी नागरिकांनी पोलिसांचा जयघोष केला व “उरुळी कांचन पोलिस जिंदाबाद” अशी चर्चा नागरिक करु लागले .
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांवर अशी ठोस कारवाई होत असल्याने गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होईल आणि समाजात पोलीस दलाबद्दल विश्वास वाढेल.”























