Homeमहत्त्वाचेगहाळ ११ मोबाईलचा शोध घेण्यात फुरसुंगी पोलिसांचे यश !

गहाळ ११ मोबाईलचा शोध घेण्यात फुरसुंगी पोलिसांचे यश !

गहाळ ११ मोबाईलचा शोध घेण्यात फुरसुंगी पोलिसांचे यश !

✍️ नितीन करडे 

पुणे : फुरसुंगी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेल्या गहाळ मोबाईलच्या तक्रारींवर तांत्रिक तपास करून तब्बल अकरा मोबाईल हँडसेट शोधण्यात फुरसुंगी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सापडलेले मोबाईल डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-५, पुणे शहर) यांच्या हस्ते तक्रारदारांना परत देण्यात आले. या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना तक्रारदारांनी व्यक्त केली. फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये विविध तक्रारदारांनी आपले मोबाईल हरवल्याची ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले.

🚨 डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते मोबाईल परत देण्यात आले –

या पथकात पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख, पोलीस हवा श्रीनाथ जाधव, हरिदास कदम, व पोलीस अंमलदार निखील पासलकर यांचा समावेश होता. पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून संबंधित मोबाईल कंपन्यांशी संपर्क साधला. मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५, पुणे शहर यांच्या मार्फत पत्रव्यवहार करून आवश्यक माहिती प्राप्त केली. त्या आधारे विविध ठिकाणांहून मोबाईल शोधून काढण्यात आले. मिळालेल्या ११ मोबाईलची एकूण किंमत अंदाजे १,५०,००० रु. इतकी आहे.

“मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद –

या संपूर्ण कामगिरीसाठी डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त (परि.-५, पुणे शहर) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) आणि अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (फुरसुंगी पोलीस स्टेशन) तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या सूचनेनुसार फुरसुंगी पोलिसांनी नागरिकांचे गहाळ मोबाईल परत मिळवून देत एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. तसेच फुरसुंगी पोलिसांचे हे कार्य नागरिक-केंद्रित पोलीसिंगचे उत्तम उदाहरण ठरत असून, या माध्यमातून पोलिसांवरील लोकांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.

मोबाईल परत मिळाल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली. गहाळ मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षा नव्हती, पण फुरसुंगी पोलिसांनी अत्यंत प्रामाणिकपणे तपास करून तो परत मिळवून दिला असे महिला तक्रारदाराने सांगितले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!