✍️नितीन करडे
पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथे तीन तासाहुन अधिक वेळ एसटी पंचर झालेल्या अवस्थेत होती. एसटी बार्शी डेपोची असुन स्वारगेट ला निघाली होती. पण उरुळी कांचन येथील एसटी स्टॅन्ड च्या थोड्या अंतरावर एसटीचा पुढील ड्राइवर साईटचा टायर पंचर झाला. एसटी बसमध्ये एक्सट्रा टायर (स्टेपनी) व टायर खोलणार पान्हा नसल्याने वेळ लागणार असल्याने आम्हा प्रवाशांना भर पावसात एसटी मधून उतरावे लागले असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
” एसटी महामंडळाचा पराक्रम पंचर झालेल्या एसटीत स्टेपनी, ना पान्हा ; भर पावसात प्रवाशांचे हाल ”
तीन तासाहून अधिक वेळ भर रस्त्यात एसटी बस असल्यामुळे वाहतुक कोंडी झाली होती. पावसाचा विचार न करता त्या ठिकाणी तैनात असलेले वाहतूक पोलीस सहा पो निरीक्षक रमेश भोसले, पो हवा शशिकांत खाडे, पो कॉ सचिन भोसले, शरद चव्हाण, धनंजय भोसले यांनी वाहतूक सुरुळीत केली.
