Homeक्राईमसोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

✍️नितीन करडे |

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३ एप्रिल) दुपारी भीषण अपघात घडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहा टायरच्या हायवा डंपरच्या टायरखाली चिरडल्याने हा मृत्यू झाला.

या अपघातात वैभव दयानंद सूर्यवंशी (वय १९ वर्ष, रा. बोरी फाटा, ता. दौंड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजण्याच्या दरम्यान सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतून मुरूम भरून येणारा दहा टायर हायवा (क्र. एमएच १२ वाय क्यू ५७९७) सोरतापवाडी फाट्यावर पुण्याच्या दिशेने वळण घेत होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक्टिवा (क्र. एमएच २४ बी झेड ८३५६) वरून येणारा वैभव सूर्यवंशी याचा अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की, हायवाच्या डाव्या बाजूच्या टायरखाली सापडून वैभवच्या डोक्यावरून टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका आणि चालक संतोष झोंबाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत तरुणाला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

” पुणे सोलापूर महामार्गावरील सहजपूरफाटा–कुंजीरवाडी दरम्यान वाढले अपघात, निष्काळजीपणा की व्यवस्थेचा अभाव? महामार्गावरील ठरत आहे अपघाताचे हॉटस्पॉट ?”

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पोलीस कर्मचारी सुमित वाघ व रवीकुमार फड यांनी काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी हायवा चालक सुनील जगन्नाथ शिंगाटे (वय ५०, रा. सोरतापवाडी) याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुणे–सोलापूर महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सोरतापवाडी फाटा येथे गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार...

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत?

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत? ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : जेजुरी–बेल्हे महामार्गावरील शिंदवणे घाट (ता. हवेली) येथे बुधवारी (ता....

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि...

पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूचा खेळ! बल्कर ट्रक चालकाचा थरार 

पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूचा खेळ! बल्कर ट्रक चालकाचा थरार  पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावर शनिवारी (ता. २८ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास एका सिमेंट वाहतूक बल्कर ट्रक चालकाने अक्षरशः मृत्यूचा...

error: Content is protected !!