Homeताज्या बातम्याजैन मंदिरामध्ये इतर धर्मीय कुटुंबाला नाकारला प्रवेश, उरुळी कांचन येथील घटना :...

जैन मंदिरामध्ये इतर धर्मीय कुटुंबाला नाकारला प्रवेश, उरुळी कांचन येथील घटना : व्हिडीओ आला समोर

जैन मंदिरामध्ये इतर धर्मीय कुटुंबाला नाकारला प्रवेश, उरुळी कांचन येथील घटना : व्हिडीओ आला समोर
✍️नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील जैन मंदिरात इतर धर्मीय लोकांना प्रवेश नसल्याची घटना समोर आली आहे. या ठिकाणी फक्त जैन लोकांनाच प्रवेश असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

(ता. ०१) मंगळवार रोजी एक कुटुंब उरुळी कांचन आश्रम रोड येथील आय डि बी आय बैंकेच्या शेजारील श्री वास्तुपूज्य स्वामी जैन मंदिर येथे दर्शनाला गेले होते. त्या ठिकाणी पुजाऱ्याच्या पत्नीने लहान मुलांसह पत्ती पत्नीला मंदिराच्या बाहेरच आडवले. आणि विचारणा केली कि तुम्ही कुठे चाललाय त्या वेळी त्यांने दर्शन घेण्यासाठी मंदिरात चालोय असे सांगितले. तर त्या महिलेने सांगितले कि या मंदिरात फक्त जैन लोकांना प्रवेश आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी नाही असे सांगितले असल्याचे दर्शन घेण्यासाठी आलेला भक्त सुदेश नायर यांनी सांगितले. तसेच पहिले तर मला व माझ्या कुटुंबाला दर्शन घेण्यास महिलेने नकार दिला. तेथे येणारे सर्व लोक मंदीरात जाऊन दर्शन घेत होते, आणि ती महिला बोलली कि मंदिरात जैन लोकांनाच प्रवेश आहे, कारण हा देव वेगळा आहे. मी व्हिडीओ काढायला चालू केला तेव्हा मला फक्त पायरीचे दर्शन घ्या असे सांगितले, मंदिरात असा भेदभाव का केला जातो.

सुदेश नायर – जैन मंदिरात दर्शनासाठी आलेले भक्त

जैन मंदिरामध्ये प्रवेश नाकारलेला व्हिडिओ…

जात भेद बघून भक्ताला मंदिरात प्रवेश नाकरणे हा एक प्रकारचा अन्याय आहे, कोठलेही मंदिर असो त्याठिकाणी जात भेद न बघतात प्रवेश असतो. मग येथे जो प्रकार घडला आहे तो नींदनीय असुन ट्रस्टींनी त्याचा खुलासा करुन, घडलेली घटना भविष्यात पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी.

रामदास तुपे,माजी उपसरपंच उरुळी कांचन 

देव हा सर्वासाठी असतो. कुठल्याही मंदीरात देवासाठी भेद भाव नसतो, मंदीर महाराष्ट्रात असुन महाराष्ट्रातील इतर धर्मीय भक्तांच्या भावनेशी खेळ होतोय, , अशा घटनेनी समाजात तेड निर्माण होईल, यांची संबधितांनी वेळेत दखल घ्यावी.

योगेश कांचन – अध्यक्ष, मृत्युन्जय प्रतिष्ठान उरुळी कांचन-

बोललेली महिला ही पुजाऱ्याची पत्नी आहे. त्यावेळी पुजारी काही साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले होते, त्या महिलेला तेथील काही माहिती नाही , कोणीही मंदिरात दर्शनाला येऊ शकतात, फक्त वेळेचे बंधन आहे, मंदिर सर्वांसाठी आहे.

-हितेश गांधी- उरुळी कांचन जैन मंदिर विश्वस्त

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री थेट: स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्सवर सर्वोत्कृष्ट ऑफर

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री आता भारतात थेट आहे. तीन दिवसांचा भव्य विक्री कार्यक्रम 14 जुलै 2025 पर्यंत खुला राहील. यावर्षीच्या प्राइम डे...

बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस 15 दिवसांपर्यंत बॅटरीच्या आयुष्यासह भारतात लाँच केले गेले: किंमत,...

शुक्रवारी भारतात बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस सुरू करण्यात आले. स्मार्टवॉच हे बोटच्या नवीन शौर्य लाइनअपमधील पहिले उत्पादन आहे. त्याच्या नावाप्रमाणेच, ते इनबिल्ट जीपीएस...

error: Content is protected !!